औरंगाबाद : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील मजुरांना काम उपलब्ध करुन देणारी महत्त्वाची योजना म्हणून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजनेकडे पाहिले जाते. निवडणूक आचारसंहितेच्या काळात या योजनेला काहीसा ब्रेक लागला असला तरी आता मात्र रोहयोच्या कामावर मजूर संख्या चांगलीच वाढली आहे. सर्वाधिक कामे ग्रामपंचायत स्तरावर सुरू आहेत. या विभागाकडून जिल्ह्यात १४ हजारावर मजुरांना काम मिळाले आहे.
महात्मा गांधी ग्रामीण राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभासह सार्वजनिक लाभाची कामे मोठ्या प्रमाणात केली जातात. यावर्षी जिल्ह्यात शौचालयात तसेच वैयक्तिक सिंचन विहिरीची कामेही मोठ्या प्रमाणावर केली जात आहेत. सर्वाधिक कामे ग्रामपंचायत स्तरावर सुरू असून या कामावर वीस हजाराहून अधिक मजूर काम करीत आहेत. दरम्यान जिल्हा परिषद बांधकाम, वन विभाग, लघुपाटबंधारे यासह इतर विभागांमध्येही मोठ्या प्रमाणावर कामे सुरू आहेत. ग्रामीण भागात दुष्काळामुळे शेती कामे ठप्प झाली होती. गेल्या सहा महिन्यांपासून मजुरांच्या हाताला काम नव्हते. त्यामुळे रोजगार हमीच्या कामांची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली. मजुरांच्या मागणीनुसार दोन आठवड्यात काम उपलब्ध करुन देणे प्रशासनाला क्रमप्राप्त आहे. त्यानुसार आता तातडीने काम उपलब्ध करुन देण्यात येत आहे. रोहयो विभाग शंभर टक्के संगणीकरण झाल्यामुळे आता प्रशासकीय मान्यता यासह सह इतर बाबी तातडीने पूर्ण होत आहेत. त्याच बरोबर मजुरांचे पगारही थेट खात्यात जमा होत आहेत. संगीसंगणकीकरणाने या विभागात गती आल्याचे बोलले जाते. त्याचबरोबर पारदर्शकतेमुळे मजूरही ही या कामाकडे आकर्षित होत आहेत.